पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा – भडगाव रोडवरील अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला . त्याचा दुसरा साथीदार जखमी झाला आहे.शहरातील बायपासवरुन जाणारा हायवे सोयीचा तितकाच मृत्यूचा सापळा झाला असून मृत्यूची शृंखला या रस्त्यावर झाली आहे. काल सायंकाळी गाडगेबाबा नगर परीसरात मिस्तरी काम करुन मयत नईम खान युनुस खान (२४) हा मोटरसायकलवर घराकडे जात असताना रेल्वे पुलाकडन भडगावकडे जाणार्या वाहनाने धडक दिली यात युनुस हा जागीच ठार झाला त्याच्या सोबत असलेला जोगेतांडा येधील बिगारी संतोष हेमराज चव्हाण (२१) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
नईम खान हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता होता कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यावेळी सचिन सोमवंशी यांनी दुःख व्यक्त करत सांगितले की येणाऱ्या २९ डिसेंबरच्या पाचोरा तालुका मेळाव्यात नईम खान यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. नईम खान यांस एक लहान मुलगी आहे बाहेरपुरा भागातील असंख्य लोक ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते







