मुंबई (वृत्तसंस्था) – जामखेड शहरातील कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता बारामतीम प्रमाणे भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला करोनामुक्त करण्यात आले. जामखेडमध्येही करोनाची रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या ११ वर गेली आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने जामखेड मध्ये ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करावा, अशी मागणी अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी केली आहे
यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले कि , अहमदनगर जिल्ह्यात कोरोना महामारी लॉक डाऊन सुरु होऊन काल एक महिना पुर्ण झाला संपुर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकार ने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचना चे पालन करीत ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी साठी कसोशीने प्रयत्न केले, रुग्णाची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले पण जामखेड, नगर शहर,संगमनेर नेवासा इत्यादी ठिकाणी अधिकचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणुन जाहीर केले.
जामखेड वगळता इतर ठिकाणे नियंत्रणात आलीही परंतु रात्री मला समजले जामखेड मध्ये आणखी दोन रुग्णाची वाढ झाली आता जामखेड मधील एकुण संख्या अकरा झाली आहे ( ९+२ विदेशी) हे ऐकुन माझे मन खुप सुन्न झाले रात्रभर झोप आली नाही,ज्याप्रमाणे बारामती येथे एक रुग्ण आढळुन आल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रूग्णांची संख्या पुर्णपणे नियंत्रणात आणली त्याप्रमाणे जामखेड मध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे .तरी शासनाने व प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी हि विनंती. जिल्ह्यातील संपुर्ण प्रशासन विशेष करून जिल्हाधिकारी, अधिकारी, डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी इत्यादी देवदुतांचे मनापासुन आभार मानतो वंदन करतो .तसेच जिल्ह्यातील सर्व जनता चांगले सहकार्य करीत आहे ,यापुढे देखील प्रशासन ला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.