जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्यावर तंबू ठोकून आयुर्वेदिक जडीबुटीची विक्री करणाऱ्या वैदूने रुग्ण तरुणाला त्याचे विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल करीत ३ लाख १२ हजारात लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे .
पोलिसांनी सांगितले की , भडगाव तालुक्यातील एका रुग्ण तरुणाची तक्रार मिळाल्यावर या आरोपीचा छडा लावून त्याला भुसावळातून अटक करण्यात आली . रस्त्यावर तंबू ठोकून हा वैदू आयुर्वेदिक जडीबुटीची विक्री करीत होता . उपचारांच्या बहाण्याने या वैदूने रुग्ण तरुणाचे विवस्त्र फोटो काढले होते . विविध कारणांनी या वैदूने रुग्णाकडून आधीच ३ लाख १२ हजार रुपये उकळले होते . नंतरही तो विवस्त्र फोटोंचे कारण सांगत ब्लॅकमेल करून १ लाख ६७ हजारांची मागणी करीत होता . स्थानिक गुन्हे शाखेने या फिर्यादीची दखल घेत आरोपीची गुप्त माहिती मिळवली .
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ युनूस शेख , अशरफ शेख , सुनील दामोदर , लक्ष्मण पाटील , पो ना . नंदलाल पाटील , भगवान पाटील , राहुल बैसाणे , संदीप महाजन , संदीप सावळे , ईश्वर पाटील यांच्या पथकाने या आरोपीला शोधून काढले . सुरजसिंग राजूसिंग चितोडिया ( रा – केसरनगर , भुसावळ ) असे या आरोपी वैदूंचे नाव आहे . स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून भडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . .







