भाजप आणि शिवसेनेची छुपी चाल चर्चेत
जळगाव ( प्रतिनिधी ) – बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एकूण मतदान ७५ टक्के पर्यंत जाण्याचा जाणकारांचा अंदाज होता सायंकाळपर्यंत रांगा कायम आहेत मतदान शांततेत सुरू आहे.अपेक्षेपेक्षा उत्स्फ़ुर्त मतदान होत असल्याचे लक्षात आल्यावर आता या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ कुणाला होणार व भाजप आणि शिवसेनेची छुपी चाल काय असणार हे मुद्दे चर्चेत आले आहेत.
बोदवड नगरपंचायतीसाठी ३ प्रभागातील ५३ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत आहे तरीदेखील नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी की कॉंग्रेस बाजी मारेल याकडे बोदवडकरांचे लक्ष लागून आहे. मतदान केंद्रावर सकाळी धिम्या गतीने सुरु असलेले मतदान अकरानंतर मात्र वाढले दुपारी दोनपर्यंत ५५ टक्के मतदान झाले आहे. पावणेसहा वाजेनंतर मतदानकेंद्रांवर काही ठिकाणी १०० पेक्षा जास्त लोक रांगेत दिसत होते . वेळेची मुदत संपेपर्यंत मतदानकेंद्रावर येणाऱ्याला प्रवेश द्यावा लागतच असल्याने मतदान अपेक्षेपेक्षाही जास्त प्रमाणात होणार हे स्पष्ट झाले आहे . मतदान शांततेत व्हावे आणि काहीही अनुचित घडू नये म्हणून सायंकाळी सहा पर्यंत जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधिकारी बोदवड शहरात थांबून होते . परिस्थितीवर लक्ष ठेऊन असताना ते सहकारी अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना देत होते .


थंडीचा कडाका अधिक असल्याने मतदान केंद्रावर सकाळी अकरापर्यंत मतदान जास्त आले नाही. मात्र अकरा वाजेनंतर मतदार बाहेर पडले. दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. प्रत्येक बूथवर चार मतदान अधिकारी, दोन पोलीस आणि शिपाई असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.एकंदरीत मतदान प्रकियेबाबत कोणीही अधिकारी नीट माहिती देत नाहीत किंवा फोनवर प्रतिसाद देत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. बोदवड. शहरात एकूण २० हजार ४१६ मतदार असून त्यात १०,१०६ महिला आणि १०,३१० पुरुष मतदार आहेत.







