जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पायी चालत असलेल्या लोकांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली तिघांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहरात काही दिवसांपासून हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणाचा प्रकार वाढला आहे . जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांनी पो उ नि अमोल देवढे, स फौ अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, हे कॉ गोरख बागुल, पो ना बैसाने, विजय पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, पंकज शिंदे, दीपक शिंदे, हेमंत पाटील यांच्या पथकाला त्यांना मिळालेली गुप्त माहिती देऊन आरोपींचा शोध घेण्यास सांगितले होते
रविवारी संशयित आरोपी नितीन दत्तू पाटील (रा. शिव कॉलनी) , गोविंदा उत्तम गोपाळ व विकास लहू गोपाळ (दोन्ही रा. साने गुरुजी कॉलनी, रामानंदनगर) या तिघांना शहरातील साने गुरुजी कॉलनी परिसरातून या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नागरिकांकडून हिसकावलेले ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाईसाठी तिघांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान यातील संशयित आरोपी नितीन पाटील यांच्यावर यापुर्वी नाशिक आणि रामानंदनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हा दाखल आहेत. जिल्हा पेठ आणि एम आय डी सी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत . दिवसभर गॅरेजवर काम करून शक्य होईल तेंव्हा मोबाइल चोरणारा नितीन पाटील सराईत गुन्हेगार आहे . गुन्ह्यात अटक केल्यावर पोलिसांवरच मारहाण केल्याचा खोटा आरोप करण्याचीही त्याला सवय आहे .