ना नफा ना तोटा तत्वावर उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी ) – आपल्याला मोतीबिंदूची समस्या आहे… खाजगी रुग्णालयात ऑपरेशन करणे परवडत नाही… तर चिंता नको. येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात दर गुरुवारी ना नफा ना तोटा तत्त्वावर प्रथम 21 रुग्णांवर अवघ्या 2500 रुपयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण केले जाणार आहे. त्याच बरोबर अवघ्या 6000 रुपयात मोतीबिंदूसाठी फेको शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशी बिना टाक्याची आपरेशन प्रणाली वापरली जाणार आहे. या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. वृषाली विवेक पाटील या स्वतः शस्त्रक्रिया करणार असून, गेली एकवीस वर्पे त्यांनी या क्षेत्रात अविरत सेवा बजावली आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
* अत्याधुनिक लेन्सचा वापर
* रुग्णाचे फिटनेस सर्टिफिकेट व रक्त तपासणी
* शस्त्रक्रियेनंतरची औषधे
* रुग्णाच्या राहण्याची व जेवणाची सोय
याशिवाय रुग्णालयात दर सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नियमित मोफत तपासणी केली जाणार आहे.
संपर्क डॉ. नितीन पाटील, मो क्र.7507724200 व 9422977071