जळगाव : डॉ. गिरीश पाटील मित्र परिवारातर्फे ३०० गरीब व गरजू कुटुंबियांना एका आठवड्याचा किराणाचे वाटप करण्यात आले.जगभरात कोरोना विषाणूंनी थैमान घातले आहे. देशात देखील झपाट्याने वाढणाऱ्या या महामारीला आळा घालण्यासाठी पंतप्रधानांनी देशात लोकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे दररोज कमावून पोट भरणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. हीबाब लक्षात घेऊन डॉ. गिरीश पाटील व त्यांच्या मित्र परिवाराकडून ३०० गरीब कुटुंबियांना एका आठवड्याचा किराणा वाटप करण्यात आला. किराणा वाटपाची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ.दिनेश महाजन, देवेश पांडे, योगेश धूत, डॉ. चेतन अग्निहोत्री, डॉ. संदीप परदेशी, संदीप गवई, राहूल पाटील यांची उपस्थिती होती.