चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – एटीएम पिन तयार करून देतो असा बहाणा बनावट अनोळखी व्यक्तीने महिलेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना टाकळी प्र.चा येथे घडली अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी प्र.चा येथील वंदना विजय पाटील (वय-४३) यांना ११ डिसेंबररोजी दुपारी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (मो. ७८६६९९२३१८) एटीएम पिन तयार करून देतो म्हणून संदेश आला. वंदना विजय पाटील यांच्याकडून बॅंक खात्याची सर्व माहिती घेतली. ॲनी डेस्क नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून खात्यातुन ४९,९९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. वंदना विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-४२० व आयटी ॲक्ट ६६ (सी) प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्वत पो नि के. के. पाटील करीत आहेत.