जळगाव ( प्रतिनिधी ) – रामेश्वर कॉलनी ( मेहरुन ) येथे स्थानिक रहिवाशांना आढळलेल्या अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाच्या अनोळखी मुलीला एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे , या अनोळखी मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन एम आय डी सी पोलिसांनी केले आहे .
ही मुलगी सध्या स्थानिक रहिवाशांनी पोलीस स्टेशनला आणलेली असून या मुलीबद्दल कोणाला माहिती असेल तर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. या मुलीला व्यवस्थित बोलता येत नसल्याने तिचे नाव , आई – वडिलांचे नाव , पत्ता अशी माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचण येत आहे . शहरात एखादी लहान मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद अन्यत्र दाखल झाली आहे का याचीही चौकशी एम आय डी सी पोलीस करणार आहेत .