धरणगाव : महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत धरणगावातून गोळा झालेला २ लाख ५१ हजार रूपये मदत निधी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. नंतर हा निधी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
गुलाबराव पाटील ५१ हजार रुपये, नगराध्यक्ष व शिवसेना नगरसेवक ५१ हजार रूपये, शिवसेना मित्रपरिवार १ लाख असे एकूण २ लाख रुपयांचा धनादेश शिवसेना शाखा धरणगाव व मित्र परिवार यांच्याकडून देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, नगरसेवक गटनेते पप्पु भावे, अहमद पठाण, विलास महाजन, विजय महाजन, जितेंद्र धनगर, नंदू पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, रवी जाधव, विलास पुंडलिक महाजन, बालु जाधव, कमलेश बोरसे, मोहन महाजन, राहूल रोकडे,बुट्या पाटील, रविंद्र कंखरे, पापा वाघरे, सतिश बोरसे, विनोद रोकडे, सद्दाम शेख, अरविंद चौधरी, गोलु चौधरी आदी उपस्थित होते.
लग्नात बचत पैसा मुख्यमंत्री निधीला
येथील माळी समाजाचे सचिव दशरथ महाजन यांच्या मुलीचे लॉकडाऊनमुळे लॉकडोअर लग्न झाले होते. त्या निमित्त सामाजिक बांधिलकी ठेवुन ११ हजार रपये, धानोराचे सरपंच भगवान महाजन यांनी ११ हजार रुपये, तसेच मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे ११ हजार रुपये अशी मदत करण्यात आली आहे.
चिमुरडीनेही दिली खाऊची रक्कम
कल्याणे होळ येथील डॉ.आर.आर.पाटील यांची नात व धरणगाव येथील आराधना हॉस्पिटलचे डॉ.धीरज पाटील यांची मुलगी कु.आराधना या चिमुकलीने खाऊसाठी जमवलेले पैसे खर्च न करता कोरोनाला पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ११ हजार रुपयांची मदत केली. ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
लोहारांनी दिला उत्तरकार्याचा खर्च
दिनेश लोहार यांचे वडील एरंडोलचे माजी नगराध्यक्ष भिका लोहार यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या उत्तरकार्य टाळून २१ हजार रुपये मुख्यमंत्री मदत निधीस देण्यात आले. पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते सदर निधी प्रांताधिकाऱ्यांना सुपुर्द करण्यात आला. या कामी शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी तसेच मित्र परिवार यांची मदत महत्वपूर्ण ठरली म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी दात्याचे आभार मानले.