भुसावळ : कोरोना महामारीच्या संकटात खऱ्या आयुष्यातील नायक डॉक्टर, पोलीस, परिचारीका, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी हे रणभूमीवर लढत आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असतांना आपला देश खूप चांगल्या प्रकारे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या सामन्यांमधील भुसावळ येथील समाज रक्षकांना त्यांच्या संरक्षणासाठी खा. रक्षा खडसे यांच्यातर्फे ५ हजार फेस मास्कचे वाटप करण्यात आले,
भुसावळ येथे आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्या हस्ते नगरपालिका दवाखाना आरोग्य कर्मचारी व रुग्ण १ हजार, सफाई कर्मचारी ६०० व इतर कर्मचाऱ्यांसाठी ५०० असे एकूण २ हजार १०० फेस मास्क नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे व नगरपालिका रूग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
याप्रसंगी मा. नगरसेवक बापू महाजन शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, सरचिटणीस, पवन बुंदेले, डॉ. तौसीफ खान, अमोल महाजन,गणेश कोळी,रोशन राणे, पृथ्वीराज पाटील,यशांक पाटील उपस्थित होते.