पाचोरा (प्रतिनिधी) – येथील नगर परिषदेने एकत्रीकरण करवाढीसंदर्भात नोटीस बजावली असून याविरोधात कॉंग्रेस मोफत हरकती नोंदवण्यासाठी मैदानात उतरली आहे कोरोनामुळे आहे त्याच टॅक्समध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
नगरपरिषदेने सन २०२० ते २०२४ पर्यंतचा एकत्रीकरण टॅक्स दहा टक्केने वाढविण्यासाठी शहरातील पंचवीस हजार घरे, दुकाने आदी मालमत्ताधारकांना नोटीस न. पा. अधिनियम १९६५ नुसार बजावली आहे. मात्र नागरींकाना या नोटीसचा अर्थच कळला नाही. नोटीसवर हरकती १७ डिसेंबरपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. ही मुदतपुरेशी नसल्याने वाढवुन द्यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी केली आहे प्रत्येक नागरिकांने टॅक्सपावती शहरातील नवकांर प्लाझा येथील सचिन मेडीको येथे जमा करावी तेथे हरकत अर्ज लोकांना मोफत मिळणार आहे त्यावर सही करावी कोरोनामुळे शहरातील व्यापारीपेठ उध्वस्त झाली असून नपाने आहे त्या टॅक्समध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नागरींकाच्या सहीने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले मालमत्ताधारकांनी हरकत घेतली नाही तर टॅक्स मान्य आहे असे समजले जाईल म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा न करता तात्काळ कॉंग्रेस पक्षाच्या मोफत हरकत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन कॉंग्रेसकडुन करण्यात आले आहे.