जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिवबानगर परिसरात बँकेने सील केलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.
पवन वसंत सोनवणे ( रा. शिवबा नगर ) यांचे जळगाव शहरातील तालुका पोलीस हद्दीत असलेले गट नंब १८५ मध्ये प्लॉट नंबर २९ येथे घर आहे. सध्या हे घर आरसीएल बँक मुंबईल यांच्या ताब्यात असून दरवाजाला कुलूपाला बँकेने सील लावले आहे. ११ नोव्हेंबररोजी दुपारी ते १२ डिसेंबररोजी सकाळी ८वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या इराद्याने घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पवन सोनवणे यांनी बँकेला माहिती दिली. दिपक शिंदे (वय-४१ , रा. सिहस्थ नगर , नवीन सिडको , नाशिक ) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ अनिल तायडे करीत आहेत.