यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. यावल पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत यावल-फैजपूर रोडवरील हॉटेल अंजली येथे रशिद अजीज पटले (वय-४२ रा. विरारनगर ) दुचाकी (एमएच १९ सीपी ५८६८) ने १० डिसेंबर रोजी दुपारी आले. त्यावेळी हॉटेलसमोर दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने पार्कींगला लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू न मिळाल्याने ११ डिसेंबररोजी सांयकाळी यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, साकळी शिवारातील मनवेल रोडवर शेख हकीम अब्दुल हकीम (वय-३९, रा. साकळी ) हे (एमएच १९ बीआर ८८७९) दुचाकीने शनिवारी दुपारी शेतात गेले. शेताच्या बांध्यावर त्यांनी दुचाकी उभी करून लावली व शेतात गेले. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. शेख हकीम यांनी यावल पोलीसात दुचाकी चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि विजय पाचपोळ करीत आहेत.