जळगाव ( प्रतिनिधी ) – महिला पतंजली योग समिती व जायंटसग्रूप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबांसाठी १० ते १६ डिसेंबरपर्यंत योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे
या योगशिबिराचे दिप्प्रज्वलन करून उद्घाटन ९६ वर्षीय मांडवगडे यांच्या व आजी आजोबा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा मनिषा पाटील यांनी प्रकल्प सहप्रमुख संजय काळे यांचे स्वागत केले.
योगासाठी योग्य हिवाळा पाहता शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यास मार्गदर्शन करण्यासाठी हा सात दिवसाचा वर्ग वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्यासाठी आयोजित केला आहे . वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आपले स्वास्थ कोणत्या योग व व्यायामप्रकार करून या वयात साधता येईल याचे मार्गदर्शन यात करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी आजी आजोबांनी हास्यासन केले . योगामध्ये भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम तसेच सूक्ष्म क्रिया हास्यासन, श्वानासन, सिंहासन घेण्यात आले सर्वांनी यात सक्रिय सहभाग घेतला. आजचा योग वर्ग मनिषा पाटील व प्रा अविनाश कुमावत या योग शिक्षकांनी घेतला. सहभागी योग शिक्षक सौ मनिषा पाटील, निशा चौधरी, महानंदा पाटील, जयश्री पाटील , रूद्राणी देवरे, प्रकाश चव्हाण, सीमा पाटील, माधुरी पाटील हे मार्गदर्शन करणार आज अँड. सीमा जाधव, ज्योती राणे, नूतन तासखेडकर, भारती कापडणे , निशा चौधरी, योगराज चौधरी, नवल पाटील, रुपेश भोई उपस्थित होते.