जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्यात सिकलसेल आजाराचे ३०० रुग्ण व ३७८४ वाहक आहेत हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे ११ ते १७ डिसेंबरपर्यंत राज्यात सिकलसेल जागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा असे राज्य सरकारचे निर्देश आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि प मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिकलसेलविषयी जनजागृती करावी असे आदेश दिले आहेत.
रावेर हा जळगाव जिल्यातील आदिवासी तालुका आहे या तालुक्यातदेखील सिकलसेल रुग्ण व वाहक जास्त आहेत . या तालुक्यात सिकलसेलविषयी जनजागृती होणे महत्वाचे आहे .या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती तसेच पाडें आहेत या लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात सिकलसेल रुग्ण असू शकतात .त्यामुळे टांगा रैलीचे आयोजन करण्यात आले. तरुण व तरुणींना लग्नाअगोदर सिकलसेल तपासणीविषियी आशा कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळेल. यासाठी आदर्श बहुउद्देशीय संस्था पुढाकार घेत आहे.
सिकलसेल हा आजार सिकलपेशी रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. लाल रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात.
1994 सालातील पाहणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमध्ये नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकलपेशी रुग्णांचे सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे. सिकलपेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकलपेशी आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील महत्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकलपेशी आजार प्रामुख्याने आढळतात.
आज रावेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत चव्हाण , जिल्हा सिकलसेल समन्वयक मनोज पाटील, आदर्श बहुउद्देशीय संस्थेचे सचिव कल्पेश मराठे, सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील कोळी व सर्व आधिकारी कर्मचारी यांनी हिरवा झेंडा दाखवून सिकलसेल जनजागृती रैलीची सुरवात ग्रामीण रुग्णालय येथून करण्यात आली.