जळगाव ( प्रतिनिधी ) – औरंगाबादची सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व घाटी रुग्णालयातील माणुसकी रुग्णसेवा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ भूषण मगर यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार सोहळा ३० डिसेंबररोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे होणार आहे. त्याच दिवशी सकाळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. डॉ.भूषण मगर पाचोऱ्याच्या विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक, डॉ भूषण मगर फाउंडेशनचे संस्थापक, पारोळ्याच्या भोलेनाथ हॉस्पिटलचे संचालक आहेत गरजू रुग्णासाठी सहकारी व मित्र परिवार सोबत घेवून रुग्णसेवक म्हणून सेवा करतात. त्यांना शासकीय सन्मान व विविध सामाजिक संस्थासह एबीपी माझातर्फे सन्मानित करन्यात आले आहे. त्यांनी कोरोनाकाळात आपले खाजगी कोविड सेंटर शासनाला समर्पित केले होते महाराष्ट्रातले असे हे पहिले कोविड सेंटर ठरले होते. रक्तदान शिबिरांचे आयोजन , खेडोपाडी मोफत आरोग्य सेवा , पाचोरा भडगाव तालुक्यातील तरुणांसाठी नोकर भरतीचे मेळावे ,अशी कामेही ते करतात . डॉ.भूषण मगर यांना या पुरस्कारासाठी निवड झाल्याबाबत संस्थापक अध्यक्ष सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल डॉ भूषण मगर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







