जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम चौकातून मोबाईलवर बोलत पायी चालत असलेल्या विद्यार्थ्यांचा धुमस्टाईल येवून मोबाईल लांबविला .सोमवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धनंजय महाजन ( वय २५) शिक्षणासाठी स्वातंत्र्य चौक येथे राहतो. तो मूळ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रूक येथील रहिवाशी आहे. धनंजय रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चौकातून पायी मोबाईलवर बोलत जात होता. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी काही कळण्याच्या आत धनंजय याचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. धनंजय याने सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पो नि किशोर पवार करीत आहेत.