पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील आरपीआयचे तालुका सचिव प्रदीप चौधरी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.पाचोरा तालुक्यातील कॉंग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष प्रवेश करुन नवीन लोकांना संधी करून देण्यासाठी कॉंग्रेसने पक्षप्रवेश सुरू केले आहे.
आर.पी.आय चे तालुका सचिव प्रदिप चौधरी यांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला असून यापुढे कॉंग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले जातील असा विश्वास प्रदिप चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी आरोग्य सेवा सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ.अनिरुद्ध सावळे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, रवी पाथरवट, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.