पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे बंद घराचे कडीकोयंडा तोडून रोकड, दागिन्यांसह साड्या असा २ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
रावसाहेब साहेबराव बेडीस्कर (वय-५०, रा. साईबाबा चौक, तामसवाडी ) कुटुंबियासह राहतात. शेती करून उदरनिर्वाह करतात.३ डिसेंबररोजी सायंकाळ ५ डिसेंबरच्या सकाळी ४ वाजेदरम्यान रावसाहेब बेडीस्कर घराला कुलूप लावून गेले होते.
अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी व कोयंडा तोडून घरात ठेवलेले ३५ हजाराची रोकड, १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे दागिने आणि ५ हजार रूपये किंमतीच्या महागड्या साड्या असा २ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. रावसाहेब बेडीस्कर यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहेत.