जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र . बो. येथे आज दुपारी एका प्रौढ व्यक्तीने नैराश्याच्या मनस्थितीत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .
शिरसोली प्र . बो. येथील रहिवाशी रघुनाथ रामदास अस्वार ( वय ४२ ) यांनी आज दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घरातील छताच्या हुकाला पांढऱ्या रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली . शिरसोली प्र . बो.चे पोलीस पाटील शरद पाटील आणि शिरसोली प्र न चे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सीएमओ डॉ अजय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले . एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . त्यांच्या पश्चात आई , पत्नी , १ मुलगा , १ मुलगी , २ भाऊ असा परिवार आहे.