मेहरुणचा तरुण गंभीर जखमी ; रुग्णालयात उपचार सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात प्राणघातक हल्ल्यांचे सत्र थांबता थांबत नाही. शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका २४ वर्षीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणावर त्याच्या ओळखीच्या सागर कंडारे व इतर एक यांनी त्याच्यावर चाकूचे पाच ते सहा वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार सुरू होते.पण गंभीर जखमी असताना नातेवाईकांनी पवनला खाजगी रुग्णालयात रात्री १२:३० वाजता हलवले आहे.
पवन उर्फ घातक सोनवणे (वय २४) रा. आदित्य चौक, मेहरुण असे जखमीचे नाव आहे. सीएमओ खानेता अनदीब आणि इतर डॉक्टर्स त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले आहेत. त्याचे नातेवाईक व मित्र परिवाराची रुग्णालयात गर्दी होत आहे. पवन उर्फ घातक सोनवणेवर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये इतर काही गुन्हे दाखल आहेत. तसेच एकदा तो हद्दपार झाला होता. एमआयडीसी पोलीस घटनेची माहिती घेत आहेत. सागर कंडारे नामक व एक इतर युवकाने पवन उर्फ घातक वर प्राण घातक हल्ला केला असल्याचे सागण्यात येत आहे. पवने ही सागर कंडारे व त्याचा मित्राला मारहाण करून जखमी केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात या दोघांनवर उपचार सुरू आहे. पण पवन उर्फ घातक सोनवणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जबर मार लागल्याने नातेवाईकांनी पवनला खाजगी रुग्णालयात हलविले आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस लक्ष ठेऊन आहे.