भुसावळ (प्रतिनिधी) – सध्या कोरोनामुळे पूर्ण देश भीषण परिस्थीतीला सामोरे जात आहे . कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली . काही डॉक्टरांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत डॉक्टर्स व नर्सिंग कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्ले झाले . त्यात मृत्यू पावलेल्या डॉक्टर्सचे मृतदेह घेऊन जात असताना सुद्धा हल्ले झाले. त्याचा निषेध म्हणून व त्वरित केंद्रीय कायदा करावा यासाठी २२ एप्रिल रोजी देशभरातील आयएमएच्या डॉक्टरांनी ” व्हाईट अलर्ट ” दिवस पाळला. रात्री पांढरा ऍप्रॉन घालून जिथे असतील तिथे मेणबत्ती लावली. डॉक्टरांचे काम सुरु राहील, कोणतेच हॉस्पिटल बंद राहणार नाही व कुणीही कोणतीच घोषणा देणार नाही. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर २३ एप्रिलला सर्व डॉक्टर्स “ब्लॅक डे” पाळणार आहेत असे भुसावळ आयएमएचे सचिव डॉ.विरेंद्र झांबरे यांनी कळवले आहे.