धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) – येथील ब-हाणपुर-अंकलेश्वर मार्गावर फैजपुरकडुन चोपड्याकडे जाणाया स्विफ्ट डिझायनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट हॉटेल यश जवळ संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास चिंचेच्या झाडावर आदळल्याने गाडीतील चालक जागीच ठार झाला.
फैजपुरकडुन चोपडाकडे जाणाNया एम.एच.१९ सी.एफ. २२९६ या स्विफ्ट डिझायनर गाडीवरील चालक सुधीर भास्कर महाले (वय ३५) यांचे गाडी चालवितांना नियंत्रण सुटून धानोरा गावाजवळील हॉटेल यश जवळ चिंचेच्या झाडावर ही कार आदळल्याने कार चालक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. त्यांना तात्काळ धानोरा प्रा .आ .केंद्राला दाखल करण्यात आले असता ते मृत झाल्याचे घोषित केले. त्यांना शवच्छेदनासाठी चोपडा रूग्णालयात पाठविले. याबाबत अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, बिट हवालदार जगदीश कोळंबे करीत आहेत.