जळगाव ( प्रतिनिधी ) – अवकाळी पावसाचा पहिला फटका आज जळगाव शहरालाही बसला . ऐन हिवाळ्यात बरसत असलेल्या या मध्यम सरींच्या पावसाने आता शेतकऱ्यांना पुन्हा मेटाकुटीला आणले आहे.


आज सकाळपासूनच शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते त्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत नव्हती . जळगावकरांची आजची पहाट मुंबईसह राज्यात अन्यत्र बरसणाऱ्या पावसाच्या बातम्या पाहतच उजाडली होती . सातारा जिल्ह्यात तर तीन दिवसांपासून पाऊस आणि धुक्याचे वातावरण आहे . दुपारी १ वाजेच्या सुमारास दाटून आलेल्या आभाळामुळे अंधाराले होते . आज सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नसल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता .
आता अवकाळी पावसाच्या त्रासाने जिल्ह्यात फळबागायतदार पुन्हा काळजीत पडले आहेत . आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झालेली असताना आता फळबागा सांभाळणे त्रासदायक होते आहे.







