पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा ते भडगाव दरम्यान दोन आयशरची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका चालकाचा जागीच मृत्यू झाला अन्य दोन जण गंभीर झाले जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .
बांबरुड (महादेवाचे) जवळील तितुर नदी पुलाजवळ भुसावळहुन मुंबईला केळी घेवुन जाणारी आयशर (क्र. एमएच. ४६ एआर. ३८८८) व भडगाव कडुन पाचोरा कडे येणारी रिकामी आयशर (क्र. एमएच. २० बीटी. २२४७) या दोन्ही आयशरची समोरासमोर धडक आहे. भुसावळहुन मुंबईकडे जाणाऱ्या आयशरचे चालक इलियास शेख (वय – ४६ रा. भुसावळ) जागीच ठार झाले . इम्तियाज खान (वय – ४३) व शाहरुख सलिम खान (वय – २८ रा. जाम मोहल्ला, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने संबंधित कंत्राटदार कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे.