जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केली आहे. आगामी काळात तालुका बैठका घेऊन जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी पुढील महिन्यामध्ये जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .

जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यातील युवक, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी, मागासवर्गीय आदी घटकांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जुन्या व अनुभवी कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत पदोन्नती देण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील अनुभवी नेत्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी तालुक्यांवर १ ते १५ डिसेंबर रम्यान तालुका बैठका घेऊन आढावा घेतला जाणार आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. जिल्हा कार्यकारिणीत काम करू इच्छिणाऱ्या नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. कार्यकारिणी सर्वसमावेशक आणि आगामी काळात काँग्रेस पक्षाला उभारी येणारी असेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली .







