मुंबई (वृत्तसंस्था) – मिलेनियम बिझनेस पार्क परिसरातील एका आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सदरील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महापालिकेने कंपनी सील केली आहे.कंपनीने काही दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांची चाचणी केली होती. त्यातील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर वाशीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात १९ कर्मचाऱ्यांपैकी ७ कर्मचारी नवी मुंबईतील रहिवाशी आहेत. तर मुंबईतील २ जण असून ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सांगली, तेलंगणा, आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची प्रशासन माहिती घेत आहे. लॉकडाऊन असताना कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर बोलावलेच कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.