यावल ( प्रतिनिधी ) – गॅस कटरच्या सहाय्याने फैजपुरात एटीएम मशीन तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न फसला असून आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली
फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्रासमोर स्टेट बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे या एटीएममधून धूर निघत असल्याचे दिसून आले यामुळे नागरिकांनी स्टेट बँकेतील कर्मचार्यांना फोन लाऊन माहिती दिली. कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पोलीस स्थानक आणि अग्नमीशामन दलास पाचारण केले.
स्टेट बँकेचे हे एटीएम गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. चोरट्यांना मशिन कापता न आल्याने अर्धवट सोडून त्यांनी पळ काढला असावा ही घटना पहाटे झाल्याची माहिती समोर आली आहे. आज चौथा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने बँकेतर्फे काल सायंकाळी एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्यात आली होती. हीच रक्कम घेऊन पोबारा करण्याचा चोरट्यांचा मनसुबा होता. मात्र त्यांना अपयश आले. फैजपूरचे सपोनि सिध्देश्वर आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्यांनी चौकशी सुरू केली अग्नमीशामन दलाने आग काबूत आणली.