अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातून बेपत्ता झालेल्या पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह बोरी नदीपात्रातील डोहात सापडल्याने खळबळ उडाली आहे
येथील कुरेशी मोहल्ल्यातील जोया शेख तैय्यब कुरेशी ही पाच वर्षांची बालिका २३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत हरवल्याची नोंद केली होती. यानंतर बोरी नदीपात्रातील डोहात तिचा मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला होता .
घटनास्थळी स पो नि मच्छिंद्र दिवे, पोउनि शत्रुघ्न पाटील आणि मिलिंद भामरे यांनी भेट दिली. मयत बालिकेच्या कुटुंबियांनी एका तरूणावर संशय व्यक्त केला असून त्याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.