जळगाव ( प्रतिनिधी ) – काँग्रेस कमिटीकडून शहरजिल्हा अध्यक्ष शामभाऊ तायडे यांच्या नेतृवात संविधान दिन विविध भागात साजरा करण्यात आला.
जुने जळगाव भागातील आंबेडकरनगरमधील बलभीम व्यायाम शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. नंतर रेल्वे स्टेशन येथे पुतळ्याला अभिवादन करून संविधान जागर रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवन येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून संविधानातील उद्देशीकाचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. याप्रसंगी सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, जाकीर बागवान, अमजद पठाण, सखाराम मोरे, मोहन गांधी, सकीना तडवी, नारायण राजपूत, शशी तायडे, महेंद्रसिंग पाटील, उमेश तायडे, रवी चौधरी, मालोजी पाटील, रफिक शेख, योगेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.