जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी तरुणाने आज दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . घरगुती वादामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असे सांगण्यात आले .
गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी विजय माणिक महाजन हा ३० वर्षीय तरुण एका कंपनीमध्ये कामाला होता . आई आणि वडिलांपासून स्वतंत्र तो पत्नीसोबत राहत होता . आज सकाळी त्याचा पत्नीशी काहीतरी कारणावरून वाद झाल्यावर पत्नी घराबाहेर गेलेली होती तेंव्हा दुपारी १२ ते १२ . ३० वाजेदरम्यान त्याने घरातच गळफासाने आत्महत्या केली असावी असे सांगण्यात येत होते . त्याच्या पश्चात आई – वडील , पत्नी , भाऊ , वहिनी असा परिवार आहे .