चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – -नांदगाव रोडवर हॉटेल तिरंगासामोर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान 4 जणांना ताब्यात घेतले दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते परिसरात आले असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली
या चौघांच्या टाटा कंपनीच्या सुमो गाडीतुन पाच कटर, दोरी, मिरचीची पुड दोन लोखंडी टॅामी सापडल्या आहेत गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिसांनी शेख साईद शेख इस्त्राईल (वय १७), फैजान शे.फारुख (18) , सलिम मोहम्मद शरीफ (22) , मन्नान शेख जब्बार शेख ( सर्व रा.मालेगाव ) यांना अटक केली त्यांच्या सोबत असलेले अन्य 2 जण ( नाव गाव माहीत नाही) फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत
जप्त केकेल साहित्य कशासाठी वाहनात होते, त्याचा उपयोग कशासाठी केला जात होता याचा शोध घेण्यासाठी आरोपीना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.