जळगाव ( प्रतिनिधी ) – शाहुनगर परिसरात मध्यरात्री घरातून चार मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहुनगरात विशाल विनायक काटकर (वय-३३) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते खासगी बँकेत नोकरीला आहे. सोमवारी रात्री सर्वजण झोपले होते. पावसाचे पाणी आल्याने घराचा दरवाजा लागत नसल्याने दरवाजा फक्त ढकललेले होता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील २ मोबाईल चोरून नेले. त्यांच्याच घराजवळ राहणारे सतीष गजानन साळुखे (वय-३९) यांचे देखील दोन मोबाईल असे एकुण ५९ हजाराचे चार मोबाईल चोरीला गेल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीला आले.विशाल विनायक यांनी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पो नि विजय ठाकूरवाड यांना घरफोडीतील संशयित आरोपी सुरत येथे जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ खवले, प्रफुल्ल धांडे, पो.ना. भास्कर ठाकरे, योगेश पाटील, पो.कॉ. रतन गिते, पोकॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे, पोकॉ. प्रणेश ठाकूर यांनी एका तासात संशयित आरोपी शोयब उर्फ एक्का शरीफ भिस्ती (वय-२०) , सागर राजू उगले (वय-२५) आणि जुबेर उर्फ डेविड जाविद भिस्ती (वय-२२) यांना शाहू नगरातून अटक केली. तिघांकडून चोरीचे चारही मोबाईल हस्तगत करण्यात आले गुरूवारी तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.