जळगाव ( प्रतिनिधी ) – कागदोपत्री वाळूचा व्यवसाय बंद असला तरी तरी गिरणा पात्रातून अंधाधुंद उपसा सुरू आहे वाळू तस्कर कुणालाच जुमानत नसल्याचे चित्र आहे. आज शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली.
वाळूची वाहतूक करणार्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आज एमएच १९ व्ही-३४४१ क्रमांकाच्या रिक्षेला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, ट्रॅक्टरच्या धुडाची पुढील दोन्ही चाके ही रिक्षात रूतून बसली. या रिक्षेचा चालक हा रिक्षातून उतरून समोर उभा असल्याने त्याला इजा झाली नाही. मात्र भर चौकात घडलेल्या या अपघाताने खळबळ उडाली. ट्रॅक्टर चालकाने घटना स्थळावरून पलायन केले.