जळगाव ( प्रतिनिधी ) – कांचननगर येथील विवाहतेचा माहेरुन दहा लाख रुपये आणावेत यासाठी छळ करणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच तरुणीचा संसार मोडला आहे.
कांचननगर येथील समीक्षा रोहित दरेकर ( वय २१) यांचा रोहित लक्ष्मण दरेकर (रा. जाजुवाडी ता.मालेगाव जि.नाशिक ) यांच्याशी गेल्यावर्षी विवाह झाला. समीक्षा हिने तिच्या माहेरून दहा लाख रुपये आणावेत यासाठी तिच्या पतीसह सासरच्यांकडून वर्षभरापासून शिवीगाळ तसेच मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. सासरच्यांनी तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले तिला घरातून हाकलून दिले पैसे आणले तर ये नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही सासरच्यांनी दिली. छळाला कंटाळून समीक्षा ऑगस्ट महिन्यात कांचननगर येथील माहेरी आल्या समीक्षा दरेकर यांनी शुक्रवारी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती रोहित दरेकर, सासरे लक्ष्मण दरेकर, सासू लता दरेकर यांच्याविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो ना योगेश माळी हे करीत आहेत.