रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या अविवाहीत युवकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली.
रावेर शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणारा योगेश प्रभाकर महाजन (वय – २८) हा घरी कोणाला न सांगता दि.१७ रोजी सायंकाळी सात वाजता टिव्हीएस कंपनीची क्र. MH 19 PC 7228 गाडी घेवून निघुन गेला होता. घरी आला नाही, म्हणुन त्याच्या नातलकांनी शोधाशोध घेतला असता त्याची मोटरसायकल निंभोरासिमच्या तापी नदीवर दिसली. पाण्यात योगेश याचा शोध घेतला असता त्याचा मृत्युदेह मिळून आला. याबाबतची माहिती शहरात पसरतात एकच हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या का ? केली याचे कारण अद्याप कळु शकले नाही.