जळगाव ( प्रतिनिधी ) – नागरिकांच्या मनातील भीती जावी म्हणून पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून असा निर्णय घेण्यात आला मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील ही घटना आहे.
गुंड प्रवृत्तीची नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी कुऱ्हा परिसरात पोलिसांकडून गुंडांची धिंड काढण्यात आली. नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी राहुल खताळ यांनी माजी सैनिकांच्या खुनातील आरोपींची धिंड काढली. ग्रामीण भागात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून खुनातील आरोपींची गावातून धिंड काढली गेली.