पाटणा ( वृत्तसंस्था ) – बिहारमधील बारह जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. येथे पती आपल्या पत्नीचा खून करुन मेहुणीसह पळून गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय वर्षा कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती देताना मोकामाचे एसएचओ राजनंदन शर्मा म्हणाले, ‘प्रथम दृष्टी हे हत्येचे प्रकरण असल्याचे निदर्शनास येते, कारण बंद पेटीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तपासात मृत शनी पासवानचा पती फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.’
या प्रकरणाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरुये. शनी पासवानने आपल्या पत्नीची हत्या केली असून हत्येनंतर तो आपल्या मेहुणीसह फरार असल्याची चर्चा आहे.
एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षांपूर्वी वर्षा कुमारी यांचे शनी पासवानसोबत लग्न झाले होते. मात्र, शनी पासवानचे पत्नी वर्षाच्या बहिणीशी प्रेम संबंध होते. त्यामुळे पत्नीची हत्या करुन शनी आपल्या मेहुणीसह फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
राजधानी दिल्लीत 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या अॅसिड पीडितेने अखेर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेने अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि तीन निरागस मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपीने तिच्या मुलांना निराधार केले आहे. त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.
ही खळबळजनक घटना घडवून आणणाऱ्या आरोपीचे नाव मोंटू असून तो महिलेवर अॅसिड ओतून फरार झाला होता. मोंटूने महिलेचे हात बांधून तिच्या अंगावर अॅसिड ओतल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली होती. पीडित महिलेचे 2011 मध्ये लग्न झाले होते. ती पती आणि तीन मुलांसह पूंठखुर्द येथे राहत होती. तिला नऊ वर्षांची मोठी मुलगी आणि सात आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत.