भुसावळ ( प्रतिनिधी ) – कैद्याला भेटू देण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडून दोन हजाराची लाच घेतांना भुसावळ कारागृहातील पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. पो. ना. अनिल देवरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांचे नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल असून ते कारागृहात आहे. या कैद्याला भेटू देण्यासाठी आरोपी पो ना अनिल देवरे यांनी ३ हजारांची लाच मागितली होती. चर्चत २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडून देवरे यांनी २ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे.
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वी करण्यात आला. संशयिताविरोधात पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







