जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बसस्थानक, आकाशवाणी चौक, बहिणाबाई चौक, महाबळ, ख्वॉजामिया चौक भागात विना परवाना लावलेल्या फलकांवर १२ नोव्हेंबररोजी महापालिकेने कारवाई केली होती. चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग, बसस्थानक ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकात तसेच ख्वॉजामिया चौक परिसरात काही जणांनी महापालिकेची परवानगी न घेता विविध जाहीरातींचे, शुभेच्छांचे फलक लावले होते. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविली या फलकांबाबबत कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले.
महापालिकेने सर्व फलक जप्त केले. रविवारी महापालिका कर्मचारी युवराज नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन फलक लावणार्या चेतन शिंपी ( रा. पोलीस कॉलनी, चंदू आण्णानगर) , निलेश जोशी, सुनील देशमुख, मिलिंद नाईक या चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना उमेश पाटील हे करीत आहेत.







