जळगाव ;- केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प वि पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पीव्हीआर सिनेमा येथे थ्रीडी चित्रपटाचा आनंद लुटला इतिहासाबरोबरच तंत्रज्ञानाची ओळख करून देत उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद लुटण्याचा एक क्षण मोकळा करून दिला.
मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी पीव्हीआर सिनेमा येथे गेले चित्रपट हा थ्रीडी असल्याने विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटला टाळ्या वाजवत व मोठ्याने घोषणा देत विद्यार्थ्यांनी तानाजीच्या प्रत्येक कृतीला भरभरून प्रतिसाद दिला.
कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी ” आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे ” ही सेनापती तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतलेली शपथ व त्याच्या प्रतीपूर्तीसाठी केलेला लढा तसेच ” गड आला पण सिंह गेला ” असे अभिमानाने निघालेले छ्त्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार विद्यार्थ्यांनी यावेळी प्रत्यक्ष अनुभवले.छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , तनाजींचा विजय असो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी सिनेमाच्या शेवटच्या दृष्याप्रसंगी दिल्या.
सिनेमा मॅनेजर आकाश सिंग तसेच स्टोअर मॅनेजर वासुदेव पाटील तसेच पीव्हीआर सिनेमा मधील सर्व कर्मचारी वृंद , शाळेचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षकांना अनमोल असे सहकार्य केले