जळगाव ( प्रतिनिधी ) – ईच्छादेवी पोलिस चौकी समोरील गणपतीनगरातील सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी पलंग, गॅस सिलिंडर , ईन्व्हरर्टर आदी साहित्य चरून नेले रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गणपती नगरात सेवानिवृत्त बँक कर्मचारी सुमंगल कैशव वाणी(वय-७७) वास्तव्यास आहेत. मार्च महिन्यापासुन ते मुलांकडे गेले असतांना घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाऊंडचे लोंखडी गेट आणि मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २ गॅस सिलिंडर , २ शिलाई मशीन, ईन्व्हरर्टर मशीन यांसह घरातील इलेक्ट्रीक फिटींगच्या वायर्स चोरट्यांनी उखडून चोरल्याचे समोर आले . सुमंगल वाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पो ना संजय सपकाळे करत आहेत.