भोपाळ ( वृत्तसंस्था ) – ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवरून गांजाची तस्कती होत असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड करत २० किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
या गांजाची तस्करी कडीपत्त्याचे नाव देऊन होत होती. गांजाचा हा साठा विशाखापट्टणममधून ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये मागवण्यात आला होता. आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये अॅमेझॉनच्या माध्यमातून आतापर्यंत एक टन गांजाची तस्करी करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली
गांजासोबत पोलिसांनी ज्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामधील एकाची ओळख सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्र सिंह तोमर अशी पटली आहे.
गेल्या चार महिन्यामध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून निर्बंध घातलेला हा मादक पदार्थ मागवण्यात येत होता. एक टन गांजा आधीच मागवण्यात आला होता. या आरोपींनी चार महिन्यांमध्ये एक कोटी १० लाख रुपयांच्या गांजाची तस्करी केली आहे.
दोन आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याला हरिद्वार येथून पकडण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमधून आरोपी सूरज ऊर्फ कल्लू पवय्या हा अॅमेझॉनवरून कडीपत्त्याचा टॅग लावत होता गांजाची डिलिव्हरी ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर जिल्ह्यांमध्ये होत असे.