मुंबई (वृत्तसंस्था ) – मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीच्या ताब्यात आहे. सचिन वाझेची पोलीस कोठडी वाढवून मिळावी या मागणीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात धाव घेतली होती.

सचिन वाझेची आणखी चौकशी करायची असल्यानं पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. न्यायालयानं अखेर सचिन वाझेची पोलीस कोठडी वाढवली आहे.







