राजस्थान (वृत्तसंस्था) – बाडमेर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 25 वर ट्रक आणि बसची जोरात धडक बसली.या धडकेनंतर दोन्ही गाड्यांना भीषण आग लागली. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
या गाडीतून 25 जण प्रवास करत होते. त्यातून 10 जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री अशोक गेहलोत रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचले आहेत.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख तर जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले आहे.







