जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथील रामशेज फाउंडेशन या सामाजिक संस्थेने आज नाशिक येथे एस टी च्या २०० आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण दिले.


एस टी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू असल्याने लोकांची गैरसोय होत असली तरी या संपाबद्दल सामान्यांमध्ये सहानुभूती असल्याने जनतेतून या आंदोलक कर्मचाऱ्यांबद्दल कोणत्याही तक्रारीचा सूर उमटलेला नाही . याचीच प्रचिती आज नाशकात आली . या आंदोलक कर्मचाऱ्यांबद्दलची सहानुभूती कायम असून शिरसोली येथील रामशेज फाउंडेशन या सामाजिक संस्थेने आज नाशिक येथे एस टी च्या २०० आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण दिले . यापुढेही सामाजिक भावना म्हणून शक्य ती मदत आम्ही या आंदोलक कर्मचाऱ्यांना करू , असे यावेळी रामशेज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .
यावेळी रामशेज फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश फुसे , सचिव अनिल गाडीलोहार , दयानंद चव्हाण , ईश्वर मांडगे , विलास सोनार आदी उपस्थित होते .







