जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा पोलीस भरती -२०१९ साठी ९ व १० नोव्हेम्बरला सर्वसाधारण आणि ११ नोव्हेम्बरला महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी शारीरिक , मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली होती या चाचणीतील गुणांच्या यादीवर आक्षेपासाठी उमेदवारांना उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे उमेदवारांनी आक्षेप असल्यास ते नोंदवण्यासाठी जिल्हा पोलीस उपाधीक्षक यांच्या समक्ष उपस्थित राहून आक्षेप नोंदवावेत असे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने कळवले आहे .
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या चाचणीतील गुणांची तात्पुरती यादी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यास असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरवले जातील . लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीतील एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे . त्यानंतर तात्पुरत्या निवड यादीवर हरकती मागवण्यात येऊन हरकतीचा निपटारा झाल्यावर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल .
लेखी परीक्षेत पात्र ठरलेले १६१७ उमेदवार शारीरिक , मैदानी चाचणीसाठी बोलावले गेले होते . यापैकी १२२५ उमेदवार हजर होते . ११४० उमेदवार शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले . छाती , उंची , कागदपत्रे अशा कारणांमुळे ८४ उमेदवार अपात्र ठरले . एका उमेदवाराने ऐनवेळी चाचणीस नकार दिला होता.