जळगाव ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील काही गावांच्या सरपंचांसह १५० दिग्गज कार्यकर्त्यांनी आज माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला जी एम फाउंडेशनच्या कार्यालयात पार पडलेला हा प्रवेश सोहळा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर चर्चेचा विषय ठरला
यावेळी खासदार रक्षा खडसे , आमदार राजूमामा भोळे , जि प अध्यक्षा रंजना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . वर्डी – गोरगावले गणाचे पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अँड एस डी सोनवणे , गोरगावालेचे माजी सरपंच सुनील चौधरी , शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख उज्ज्वल पाटील , कोलंबाचे माजी सरपंच प्रताप कोळी , भारडोहचे सरपंच मनोज पाटील , भारडोहचे उपसरपंच निंब पाटील , कोलंबाचे माजी सरपंच भीमराव कोळी , भारडोहचे माजी सरपंच रतन मोरे , कोलंबाचे माजी सरपंच साहेबराव कोळी , खेडगावचे सरपंच राजू सोये पिंपरीचे माजी सरपंच संजू इंगळे , गोरगवलेंचे उपसरपंच अण्णा कोळी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला .