पहूर (प्रतिनिधी) – जामनेरकडून औरंगाबादकडे कत्तलीसाठी १५ म्हशी घेऊन जाणारा ट्रक आज पहाटे पोलिसांनी पहूर गावाजवळ पकडला या ट्रकसह म्हशी जप्त करून पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
आज सकाळी पो. उ नि. संजय बनसोड, नवल हटकर ,पोहेकॉ प्रदीप चौधरी, पोना ज्ञानेश्वर ढाकरे हे कार्यालयात असतांना पो नि अरुण धनवडे यांनी कळविले की गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार , जामनेरकडुन औरंगाबादकडे ट्रकमध्ये कत्तलीसाठी म्हशी नेल्या जात आहेत , म्हशी कत्तलीसाठी जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने ट्रकचा पाठलाग करुन कारवाईसाठी पोलीस निरीक्षक यांचेसह पोलिसांचे पथक पहुर बस स्थानकावर थांबले होते ट्रक जामनेरकडुन पहुरकडे येतांना दिसल्यावर थांबण्याचा इशारा करूनही तो न थांबता औरंगाबाद रोडने भरधाव वेगाने निघाला होता त्यानंतर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करुन पहुरजवळील अजिंठा पेट्रोल पंपासमोर ट्रक थांबवून चौकशी केली.
या ट्रक क्र. MP-09 GG-8665 चा चालक सुरेश सेन ( वय 45, रा. कोठरी, ता. नरसिंगगड, जि. राजगड (मध्यप्रदेश), क्लिनर सादिक चांद खान ( वय 35 रा. कोठरी ता. नरसिंगगड, जि. राजगड, (मध्यप्रदेश) यांची चौकशी केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने म्हशी कत्तलीसाठी जात असल्याची पोलिसांची खात्री झाली. या ट्रकमध्ये 15 म्हशी होत्या . पो. काँ नवल हटकर यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात ट्रक चालक व क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.